कॉल करा
9881059007यशदा मल्टीस्टेट ही अशी बँक आहे जी फक्त स्वप्नच दाखवत नाही तर ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य ही देते .आज समाजात अनेक घटक आहेत ज्यांना खंबीर,भक्कम आधाराची गरज आहे, जसे शेतकरी, नवउदयोजक, महिला, इ, सर्व घटकांना प्रेरणा उत्साहासह आर्थिक पाठबळ ही यशदा देते. या सहकाराच्या साखळीतून एक बुलंद भारत बनविण्यासाठी यशदा सक्रीय आहे. यासाठी छत्रपती शिवप्रभू, राजर्षी शाहु महाराज, महिंद्रा, रतनजीटाटा आणि श्री व सौ नारायण मूर्ती यांचे आदर्शांचा प्रभाव यशदावर आहे.
सामाजिक बांधिलकी जपताना आम्हाला समाजातूनच प्रेरणा मिळते, विश्वास मिळतो. सर्व सामन्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहावा चांगली जीवनशैली विकसित व्हावी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा पिढी आणि जेष्ट नागरिक इ. सर्वांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी, यशदा मल्टीस्टेट प्रयत्नशील आहे आणि राहील या कार्यामध्ये आपला सहभाग सदैव अपेक्षित आहे.
समाधानी खातेदार
प्रशिक्षित कर्मचारी
दिवस अखंड सेवा
संस्थापक / चेअरमन
यशदा मल्टिस्टेट को.ऑप.क्रेडिट सो.लि
‘यशदा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट. सो. लि ही बॅंक गेली 12 वर्षं ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहे. यंदा बॅंकेचा तपपूर्ती सोहळा साजरा होताना दिसतो आहे. गेली 12 वर्षं बॅंकेने लोकांचा विश्वास जिंकत बॅंकिग व्यवसायात नाव कायमच अग्रेसर ठेवलं आहे. बॅंकेच्या सातही शाखा ग्राहकांच्या सेवेत सदैव तत्पर असून बॅंकिंग ही प्रोसेस ग्राहकांसाठी अधिकाधिक सोपी करण्याकडे त्यांचा कायमच कल राहिला आहे. बॅंकेच्या 99 % टक्के कर्जवसुली धोरणामुळे कमी कालावधीतच बॅंकेने मोठा पल्ला गाठला आहे.’ मागील 12 वर्षांप्रमाणेच पुढील सगळी वर्षं बॅंक अशीच उत्तम सेवा देत राहील याची खात्री मी देतो.’